गच्चीवरून खाली उतरतांना...... गेले जवळ जवळ पाच महिने झाले , गच्चीवर जाम धमाल चाललीय . इतर गमती जमती २ हा सध्यातरी शेवटचा लेख , गच्चीवरील गमतीजमती या भागातील . आता वेळ आलीय गच्चीवरून खालच्या मजल्यावर म्हणजे घराच्या मजल्यावर उतरण्याची . हा मजला म्हणजे तेव्हाचा तिसरा मजला आणि आताचा दुसरा मजला , कारण तेव्हा 'ग्राउंड फ्लोअर' ही संकल्पना नव्हती . एकदम पहिला मजला , दुसरा मजला वगैरे वगैरे . म्हणून तेव्हाचा तिसरा मजला . तेव्हा या मजल्या विषयी थोडी माहिती . आधीच्या एका लेखात उल्लेख केल्या प्रमाणे या इमारतीला तीन बाजुंनी रस्ते आहेत आणि एक बाजू , बाजूच्या इमारतीची सामायिक बाजू आहे . तर या रस्ते असलेल्या तीनही बाजूने एक सलग इंग्रजी अक्षर सी आकाराची संपू...