इतर पापड आणि वाळवणं -२ (गच्चीवरील गमती जमती) यात एक फारच मनोरंजक आणि चित्तवेधक प्रकार म्हणजे कऱ्होडे ! हा खास आमच्याकडचा शब्द . बाकी लोक याला वडे, सांडगे वगैरे म्हणतात . ह्याची गम्मत म्हणजे ह्यासाठी लागणारे मिश्रण एकदा तयार झाले , की हे करण्यासाठी कुठलेही उपकरण लागत नाही . बाकी वाळवणाचे तसे नाही . एकेकाचे एकेक नखरे , कुणाला हे उपकरण लागते तर कुणाला ते . प्रत्येकाचे एक एक खास उपकरण ! ...